Type Here to Get Search Results !

‎माझी हो, नाहीतर बदनाम करीन’—युवकाचा थरकाप उडवणारा इशारा”

यवतमाळ :

‎             “माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझे फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करीन” अशा थेट आणि निर्लज्ज धमक्या देत एका युवकाने पोस्टमास्तर तरुणीला ब्लॅकमेल केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून संबंधित तरुणीने अखेर पोलिसांत धाव घेतली आहे.


       ‎२२ वर्षीय तरुणी ही झरी तालुक्यात पोस्टमास्तर म्हणून कार्यरत आहे. दोन वर्षांपूर्वी ओळख झालेल्या युवकाने तिच्या नकारानंतर विकृत वर्तन करत सतत फोन करून मानसिक छळ सुरू ठेवला. “तू माझ्याशीच बोल, नाहीतर तुझे खासगी फोटो व्हायरल करीन” अशा धमक्या देत तिला दडपणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.


‎            २५ मार्च रोजी दुपारी पुन्हा फोन करून आरोपीने लग्नासाठी जबरदस्तीचा दबाव टाकला. स्पष्ट नकार मिळताच त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मर्यादा ओलांडली. एवढ्यावर न थांबता तरुणीचे इतर मित्रांसोबतचे फोटो चुकीच्या पद्धतीने प्रसारित करून तिची बदनामी करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.


‎        आरोपीकडून सतत फोन करून त्रास देणे, कॉलवर लक्ष ठेवण्याचा संशय आणि वारंवार भेटण्याची जबरदस्ती—या सर्व प्रकारांमुळे तरुणी त्रस्त झाली होती. अखेर धैर्य एकवटत तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.


         ‎या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. महिलांना लक्ष्य करून ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढत असल्याने कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image