Type Here to Get Search Results !

‎ट्रिप टार्गेटच्या दबावात अपघात ? चालकाचा दुर्दैवी अंत


वणी :

‎             वेकोलीशी संलग्न असलेल्या "नारायणी सन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड" या कंपनीचा व्होल्वो ट्रक उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार, दि. ३० मार्च रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या दरम्यान उकणी कोळसाखानी परिसरात घडली.
‎            सदर कंपनी कोळसाखाणीत ओबी (ओव्हर बर्डन) उत्खननाचे काम करीत असून नुकतेच या कंपनीला उकणी कोळसाखाणीच्या विस्तारीकरणाचे कंत्राट मिळाले आहे. डम्पिंग यार्डमध्ये माती खाली करून परत येत असताना संबंधित व्होल्वो ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
‎       मृत चालकाचे नाव वीरभान यादव, वय ३० वर्षे, जिल्हा सिद्दी, मध्यप्रदेश असे असून तो या कंपनीत चालक म्हणून कार्यरत होता. दरम्यान, या अपघातानंतर चालकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, मृत चालकाच्या कुटुंबीयांना कंपनीकडून आर्थिक मदत देण्याची मागणी इतर चालकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad