Type Here to Get Search Results !

वणीतील ‘सायलेंट’ चोरी, आवाज न करता लाखोंचा माल गायब

 वणी : 

‎         शहरातील गणेशपुर परिसरात एक रहस्यमय घरफोडीची घटना उघडकीस आली असून, एका बंद घरातून तब्बल २.३० लाखांचे सोन्याचे दागिने क्षणात गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.

‎         रामरतन सिताराम हरडे (वय ५९), WCL कर्मचारी, यांनी २१ एप्रिल रोजी सायंकाळी आपल्या घराला कुलूप लावून ड्युटी गाठली. सर्व काही नेहमीप्रमाणेच पण पुढील २४ तासांत नेमकं काय घडलं, याचा थांगपत्ता लागलेला नाही.

‎       २२ एप्रिल रोजी दुपारी परतल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घराचे कुलूप तोडलेले, आत सर्व अस्ताव्यस्त आणि कपाटातील सोन्याचे दागिने गायब. 

‎          चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घरात प्रवेश करून दोन सोन्याच्या बांगळ्या (४० ग्रॅम), एक गोप (२० ग्रॅम), दोन अंगठ्या (१० ग्रॅम) आणि कानातील लटकन (६ ग्रॅम) असा एकूण ७६ ग्रॅम मुद्देमाल लंपास केला. एकूण किंमत सुमारे २.३० लाख रुपये.

‎          विशेष म्हणजे, ही घटना नेमकी २१ एप्रिल दुपारी ४ ते २२ एप्रिल दुपारी ३ या कालावधीत घडली, जेव्हा घर पूर्णपणे रिकामं होतं. चोरट्यांना घराची माहिती होती का ? की हा केवळ संधीचा फायदा ?

‎       या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(a) BNS अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोउपनि साजिद सैय्यद तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image