Type Here to Get Search Results !

‎“सीसीटीव्हीला चकवा की आतली माहिती ? वणी उपकेंद्रातील चोरी गूढ”

वणी :

‎           शहरातील 220 के.व्ही. उपकेंद्रात अज्ञात चोरट्यांनी थेट कुंपण कापून आत घुसत मोठी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तब्बल 9 कॉपर अर्थिंग रॉड लंपास करण्यात आले असून सुमारे 1 लाख 35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, ही चोरी सुरक्षा व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून झाल्याने संताप व्यक्त होत आहे.


‎             माहितीनुसार, 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी नियमित पाहणीदरम्यान 220 के.व्ही. पांढरकवडा, चंद्रपूर आणि वरोरा लाईनवरील प्रत्येकी 3 असे एकूण 9 कॉपर रॉड गायब असल्याचे आढळले. तपासात चोरट्यांनी उपकेंद्राचे तारांचे कुंपण कापून निर्भयपणे आत प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आयसोलेटरला जोडलेले मौल्यवान कॉपर रॉड उचलून ते पसार झाले.


‎           या घटनेत सर्वात गंभीर बाब म्हणजे रात्रीच्या पाळीत असलेल्या सुरक्षा रक्षकांकडून झालेला कथित हलगर्जीपणा. एवढ्या संवेदनशील ठिकाणी चोरी होणे ही सुरक्षा व्यवस्थेची मोठी चूक असल्याचे बोलले जात आहे.


‎          उपकार्यकारी अभियंता विनोद शेंडे यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करून भारतीय विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 व 136 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई व सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे.


‎          दरम्यान, या धाडसी चोरीमुळे वणी परिसरातील वीज सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image