Type Here to Get Search Results !

शेतात आग, गावात चर्चा—अपघात की सूड ?

मारेगाव :

‎              तालुक्यातील चोपन येथील शेतशिवारात कोठ्याला आग लावून नुकसान केल्याची घटना १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         ‎फिर्यादी पंकज सुरेश खिरटकर (वय ३३, रा. चोपन) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतातील कोठ्यात ठेवलेली शेतीसाठीची अवजारे व साहित्य आगीत जळून खाक झाले. घटनेच्या वेळी त्यांनी शेतातून धूर निघताना पाहून तेथे धाव घेतली असता कोठ्याला आग लागलेली दिसली.
‎         यावेळी शेजारच्या शेतातील उदय भाऊराव खिरटकर (वय ३७) व प्रविण भाऊराव खिरटकर (वय ३५) हे घटनास्थळावरून पळून जाताना दिसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फिर्यादी व आरोपी यांच्यात शेताच्या रस्त्याच्या कारणावरून पूर्वीपासून वाद असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
‎      या आगीत शेतीसाठी लागणारी विविध अवजारे, स्प्रे पंप, स्प्रिंकलर सेट, रासायनिक खत, ताडपत्री, विद्युत तारा व इतर साहित्य जळून सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
‎      या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 326(f) व 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास ASI दिगंबर किनाके करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image