Type Here to Get Search Results !

‎जि.प. शाळा मारेगांव येथे बाल आनंद व महिला मेळावा उत्साहात संपन्न ‎


वणी :

‎            शुक्रवार, दिनांक १३ मार्च २०२६ रोजी शाळेत बाल आनंद मेळावा व महिला मेळावा उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक व महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.


‎         विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षणासोबत आनंदही मिळावा या उद्देशाने बाल आनंद मेळाव्यात विविध चवदार पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. महिला मेळाव्याच्या निमित्ताने महिलांसाठी विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


‎       कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने महिला मंडळाच्या भजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय श्री. सचिन भाऊ डोंगे (अध्यक्ष, शा.व्य. समिती) उपस्थित होते. उद्घाटक म्हणून आदरणीय श्रीमती वंदनाताई विकासजी भोंगळे यांनी उपस्थिती दर्शविली.


            प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय श्री. रमेशजी भोंगळे सर (सरपंच), श्री. गणेशजी भोयर सर (विस्तार अधिकारी), श्री. राजुरकर सर (केंद्रप्रमुख), श्री. लक्ष्मणजी वैद्य (अध्यक्ष, गुरुदेव सेवा मंडळ), श्री. कोवे सर, सौ. कल्पनाताई बोढाले (उपाध्यक्ष), सौ. हिराताई दातारकर (उपसरपंच), सौ. संगीताताई ठाकरे (सदस्य, ग्राम), गौरीताई भोंगळे, सौ. संध्याताई ठाकरे, सौ. पल्लविताई बलकी, श्री. अमोलभाऊ ठाकरे, श्री. दिवाकरभाऊ उरकुंडे तसेच गावातील इतर प्रतिष्ठित व्यक्ती व सर्व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‎     या मेळाव्यामुळे शाळा व समाज यांच्यातील नाते अधिक दृढ झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जीवन चौधरी सर यांनी केले. प्रास्ताविक सुके सर यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन आस्वले मॅडम यांनी केले. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad