Type Here to Get Search Results !

शिवसेना (उबाठा) व एकवीरा पतसंस्थेचा महिला सक्षमीकरणासाठी इफ्तार पार्टीचा आदर्श उपक्रम

 मारेगाव  :

‎       शिवसेना (उबाठा) पक्ष व एकवीरा महिला पतसंस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून मारेगाव येथे मुस्लिम समाजातील महिला सखींसाठी “इफ्तार पार्टी”चे आयोजन ‎करण्यात आले. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत बहुसंख्य महिला उपस्थित राहिल्या.


‎          या कार्यक्रमाला शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सौ. सुनंदाताई गुहे, महिला तालुका प्रमुख सौ. सुरेखाताई ढेंगळे, शहर संघटिका डॉ. सपना केलोडे, सय्यदजी कूबरा जहा, आलमजी आरा, फरसजहाजी शरीफ, डॉ. यास्मिनजी यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरपंचायत सदस्या अंजुमजी शेख (थरांगणाजी पटेल), अ‍ॅडव्होकेट ह्युमेराजी शरीफ, तसेच मुस्कानजी शरीफ यांनी नात पठण करून रमजान महिन्याचे धार्मिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.


‎            तसेच नगरपंचायत सदस्या वर्षाताई किंगरे, रश्मी चौधरी, रजनीताई बोढाले, एकवीरा महिला पतसंस्थेच्या सचिव सौ. माधुरी नगराळे, विद्याताई मत्ते, सुरेखाताई भेले, मंगलाताई आसेकर, रंजनाताई येरगुडे, वंदनाताई दुमोरे, प्रतिभाताई डाखरे, विद्याताई भेले, जयश्री वरारकर, लता डाखरे, ऋतुजा यांच्यासह पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.


‎          या प्रसंगी किरणताई देरकर यांनी बोलताना सांगितले की, पवित्र रमजान महिन्यात अशा प्रकारच्या इफ्तार पार्टीचे आयोजन करून सामाजिक ऐक्य व महिला सक्षमीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. “जनसेवा हीच ईश्वर सेवा” हा ध्यास घेऊन सुरू असलेले हे कार्य आता लोकाभिमुख होत असून समाजासाठी अनुकरणीय ठरत आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच मारेगाव येथे हा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.


‎       कार्यक्रमात धार्मिक व सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन घडले.

‎शेवटी खालील ओळींनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली —

‎जाहा जिक्र हबीब होता है,

‎खुद खुदा भी करीब होता है,

‎उनकी महफिल में बैठने वाला,

‎हर शख्स खुशनसीब होता है.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image