Type Here to Get Search Results !

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव प्रयत्नशील नेतृत्व ‎सौ. किरणताई संजय देरकर

वणी :

‎              “महिला ही केवळ घराची शोभा नसून समाजाची ताकद आहे.” या विचाराने प्रेरित होऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करणारे नेतृत्व म्हणजे सौ. किरणताई संजय देरकर. समाजात महिलांना केवळ चुल आणि मुल या चौकटीत मर्यादित न ठेवता, त्यांना कर्तव्याच्या ओझ्याबरोबरच जीवनाचा आनंद घेता यावा, स्वावलंबी बनता यावे आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेता यावेत यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करत आहेत.

‎              स्त्रियांची मानसिकता बदलणे हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे काम आहे. विशेषतः ग्रामीण भागात अजूनही अनेक स्त्रिया स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांची निर्णयक्षमता वाढणे अत्यंत गरजेचे आहे. भारतीय संविधानाने महिलांना अनेक अधिकार दिले आहेत, मात्र त्या अधिकारांची माहिती प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी समाजात प्रबोधन होणे तितकेच महत्त्वाचे आहे.

‎                 आज स्त्री अनेक क्षेत्रात प्रगती करत असली तरी अजूनही आपण स्त्री १००% सक्षम झाली आहे असे म्हणू शकत नाही. कारण महिलांवरील अन्याय, अत्याचार, बलात्कार, स्त्रीभ्रूण हत्या, कौटुंबिक हिंसाचार तसेच कामाच्या ठिकाणी होणारे शोषण या घटना पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. या सर्व अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे ही काळाची गरज आहे.

‎        याच उद्देशाने “सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन” च्या माध्यमातून महिला सखींचे संघटन करून “वाण आरोग्याचे व स्त्रियांच्या सन्मानाचे” या उपक्रमाद्वारे समाजात प्रबोधनाची वारी सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून वैचारिक परिवर्तनाची क्रांती समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‎            सौ. किरणताई देरकर यांनी हजारो विधवा महिलांच्या कपाळी कुंकू लावून हळदी-कुंकू हा केवळ सौभाग्याचा नव्हे तर सन्मानाचा वाण आहे हा संदेश समाजात दिला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करून महिलांच्या सन्मानाची नवी चळवळ त्यांनी उभी केली.

‎          त्यांच्या मते महिला दिन हा केवळ एक इव्हेंट नसून महिला शक्तीचा उत्सव असला पाहिजे. स्त्रीशक्तीचा जागर समाजात सतत होत राहिला पाहिजे. महिलांनी स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव ठेवून आत्मविश्वासाने पुढे यावे, हा त्यांचा मुख्य संदेश आहे.


‎  📌 सामाजिक उपक्रम :-


  • ‎  सौ. किरणताई संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
  •  कोरोना काळात विधवा झालेल्या तरुण महिलांना त्यांच्या कुटुंबाचा आधारस्तंभ बनण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
  •   विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे व शुभकार्यांमध्ये त्यांना सन्मान मिळावा यासाठी “वाण आरोग्याचे व स्त्रियांच्या सन्मानाचे” हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
  •  पुरग्रस्तांना अन्नधान्य, औषधे, कपडे, शालेय साहित्य इत्यादी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
  •   वणी शहरात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी निवेदन व आंदोलन करण्यात आले.
  •  महिलांवरील अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन आवाज उठविण्यात आला.
  •  ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण मेळावे आणि आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली.
  •  शहरातील प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस बांधवांना राखी बांधून महिलांच्या संरक्षणासाठी ओवाळणी कार्यक्रम राबविण्यात आला.
  •   गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे नियमित वाटप करण्यात येते.
  •  घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी “महिला उद्योजिका भव्य प्रदर्शनी व विक्री” या उपक्रमाद्वारे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
  •   समाजातील सर्व स्तरातील महिला व युवतींच्या विकास आणि संरक्षणासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
  •  विविध सामाजिक प्रश्नांवर आंदोलने व मोर्चे आयोजित करून जनजागृती करण्यात आली.


‎📌   सन्मान आणि पुरस्कार :-

                   ‎महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन सौ. किरणताई संजय देरकर यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत :

  • ‎      भारतीय नारी रत्न पुरस्कार
  • तेरापंथी महिला मंडळ तर्फे “प्रेरणा सन्मान पुरस्कार”

‎📌 जबाबदाऱ्या :-


  • ‎विभागीय अध्यक्षा – ओबीसी महिला महासंघ
  • ‎अध्यक्षा – एकविरा महिला पत संस्था, मारेगाव (मार्डी), जि. यवतमाळ
  • संचालिका – वणी नागरी सहकारी बँक, वणी जि. यवतमाळ
  • संचालिका – किसान शिक्षण प्रसारक मंडळ, वेगाव, ता. मारेगाव, जि. यवतमाळ
  • ‎मार्गदर्शिका – श्री लक्ष्मी गहिलर पत संस्था, वणी
  • ‎तज्ञ संचालिका
  • अध्यक्षा – धनोजे कुनबी विकास संस्था, वणी

‎संपर्क :-

‎ई-मेल : ramkrishnaharil616@gmail.com

‎मो. नं. : 9420369316

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image