येथील धनोजे कुणबी समाज संस्था, वणी यांच्या वतीने दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या बीजनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष मंगेश रासेकर यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून समाजाला दिलेला समता, सदाचार आणि भक्तीचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगितले. संतांच्या विचारांचे अनुसरण केल्यास समाजात बंधुता आणि एकात्मता अधिक बळकट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
धनोजे कुणबी समाज संस्थेमार्फत विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम राबविले जात असून समाजात एकजूट निर्माण करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहेत. तुकाराम महाराज बीज निमित्त आयोजित हा अभिवादन कार्यक्रमही त्याच प्रयत्नांचा एक भाग असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव अंबादास वागदरकर, कोषाध्यक्ष रामराव गोहोकर, नामदेवराव जेणेकर, व्यवस्थापक कवडू नागपूरे, बाळासाहेब राजूरकर, सचिन ढोके, श्रीकांत गोहोकर, सुनील लखमापुरे, भूपेंद्र देरकर, विनोद थेरे, सुरेंद्र बुचे, गुलाबराव आवारी, जयप्रकाश राजूरकर, रोहन मोडक, विनोद बुचे, अरुण डवरे, दिलीप वागदरकर, नारायण ढवस यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण भक्तिमय झाले होते. उपस्थितांनी संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या आदर्शांचा समाजजीवनात अवलंब करण्याचा संकल्प व्यक्त केला.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या