वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते शिंदोला येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या महाआरोग्य शिबिराचे मुख्य आयोजक म्हणून यवतमाळ जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, विविध तपासण्या तसेच मोफत शस्त्रक्रियेची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. शिरपूर व कोलगांव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी आमदार संजय देरकर यांनी नागरिकांशी संवाद साधत सांगितले की, “सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. या शिबिरातील रुग्णांना पुढील उपचारांसाठीही पूर्ण सहकार्य केले जाईल.” कार्यक्रमास विविध पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सावंगी मेघे रुग्णालयाची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांनीही शिबिराच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून आयोजक संजय निखाडे यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या