Type Here to Get Search Results !

वणीतील धक्कादायक प्रकार, कुलूप फोडून घरात घुसण्याचा चोरीचा प्रयत्न


 ‎वणी : 

‎         शहरातील वार्ड क्रमांक 13, तलाव रोड परिसरात चोरीच्या प्रयत्नाची धक्कादायक घटना घडली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजताच्या सुमारास, विवेक पांडुरंग ताटेवार (वय 53, व्यवसाय – सायकल दुकान, रा. योगिराज नगर, वणी) यांच्या घराचे मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात आरोपींनी घरात प्रवेश केला.


           या प्रकरणी जनरलसिंग उर्फ मन्नुसिंग रामसिंग टाक (वय 45, रा. दुर्गापुर, जि. चंद्रपूर) व दिपक गणपत येरेकर (वय 36, रा. दुर्गापुर, जि. चंद्रपूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला; मात्र सुदैवाने कोणतीही मालमत्ता चोरीस गेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

‎       या घटनेची नोंद करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 331(4), 305(अ), 62 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मारोती पाटील, वणी पोलीस स्टेशन करीत आहेत.

‎        दरम्यान, भर संध्याकाळी घरफोडीचा प्रयत्न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी गस्त वाढवून आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad