Type Here to Get Search Results !

संविधान आणि लोकशाही रक्षणासाठी 'वंचित'चा आक्रमक पवित्रा ‎


वणी :

‎       देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत होत असलेल्या 'मोदी हटाव, देश बचाव' आंदोलनाच्या समर्थनार्थ, वणी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. सोमवारी, २ मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर, जिल्हा महासचिव मिलिंद पाटील आणि जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली वणी उपविभागीय अधिकारी (SDO) यांना केंद्र सरकारच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले.

‎           यावेळी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारच्या अमेरिका धार्जिण्या धोरणांवर सडकून टीका करण्यात आली. भारत-अमेरिका व्यापार करारामुळे अमेरिकेतील स्वस्त सोयाबीन, मका आणि ज्वारी भारतात आयात होऊन स्थानिक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जाणार असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. तसेच जागतिक स्तरावर गाजत असलेल्या 'एपस्टिन' फाईल्स प्रकरण आणि राफेल करारातील संशयास्पद व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत, देशाचे हित विदेशी शक्तींकडे गहाण ठेवले जात असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

‎         या आंदोलनात वणी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्तीप्रदर्शन केले. यामध्ये वणी तालुकाध्यक्ष डॉ. प्रशिक बरडे, वणी तालुका महासचिव आशिष पाझरे, तालुका उपाध्यक्ष ऍड. चंदू भगत, तालुका सचिव मिलिंद नगराळे, तालुका मुख्य संघटक अंकित पाझारे, किशोर मुन, नंदिनी ठमके, वैशाली गायकवाड, शारदा मेश्राम, शुभांगी नगराळे, अर्चनाताई नगराळे, कीर्ती लभाने, नवनाथ तेलतुंबडे, किशोर तेलंग, तन्मय लामसोंग, चंद्रकांत धोपटे, विठ्ठल सातपुते, रवींद्र वनकर, विलास तेलतुंबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या सर्व शाखा व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image