येथील पोलीस स्टेशनच्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मटका जुगार उधळून लावला तसेच गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडत महत्त्वाची कारवाई केली आहे.
दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक ताठे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. या कारवाईत अब्दुल रज्जाक शेख मुखत्यार (रा. मुकूटबन) याच्याकडून वरली मटका जुगार साहित्य व रोख रक्कम १,४२० रुपये जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
तसेच दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी गोवंश तस्करीविरोधात कारवाई करताना TS-16-UD-2832 क्रमांकाचे मॅक्झीमा वाहन पकडण्यात आले. या वाहनातून कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ३ गोवंशांची सुटका करण्यात आली. या प्रकरणात अंदाजे १,३८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालकाविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० अंतर्गत कलम ११ (१) (घ), (ङ), (झ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे व पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रविण हिरे, पो.हेड कॉ. दिपक ताठे, विनोद नागरगोजे, रवि ईसनकर, बादल जाधव व निहाल राठोड यांनी सहभाग घेतला.
पोलीसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या