शहरातील मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या माध्यमातून तब्बल ५ हरवलेले मोबाईल फोन शोधून काढत नागरिकांना परत दिले आहेत. या धडाकेबाज कारवाईमुळे मोबाईल चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.
CEIR पोर्टल हॅण्डलर LPC/493 छाया उमरे यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करत ही यशस्वी मोहीम राबवली. वणी पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी नोंदवलेल्या मोबाईल मिसिंग तक्रारींच्या आधारे सखोल तपास करण्यात आला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पोलिसांनी मोबाईलचा मागोवा घेत अखेर ते हस्तगत करण्यात यश मिळवले.
हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिस प्रशासनाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे, ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत वेगाने व प्रभावीपणे पार पडली.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या