वणी :
तालुक्यातील खांदला येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायत भवन (३० लाख रुपये) लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सदर सोहळा माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार (वणी विधानसभा क्षेत्र) यांच्या हस्ते संपन्न झाला.
या ग्रामपंचायत भवनासाठीचा निधी संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला होता. शिवजयंतीच्या पवित्र दिवशी हे भवन जनतेच्या सेवेसाठी समर्पित करताना त्यांनी विशेष आनंद व अभिमान व्यक्त केला.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर, भाजपा तालुकाध्यक्ष प्रदीप जेऊरकर, माजी तालुकाध्यक्ष गजानन विधाते तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा लोकार्पण सोहळा पार पडला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
एकंदरीत, शिवजयंतीच्या पावन दिवशी साकारलेले हे विकासकाम गावाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या