Type Here to Get Search Results !

बोटोनीत कबड्डीचा जल्लोष; बोदकुरवार यांनी दिले खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन ‎

वणी :

‎             तालुक्यातील बोटोनी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार साहेब (वणी विधानसभा क्षेत्र) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत क्रीडाक्षेत्रातील संधी व शिस्तीचे महत्त्व पटवून दिले.

‎                शिवजयंतीनिमित्त आयोजित या क्रीडा स्पर्धांमुळे युवकांमध्ये क्रीडाभावना, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. शिवरायांच्या पराक्रम, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेच्या विचारांनी प्रेरित होऊन तरुणांनी खेळासोबतच समाजकार्यातही सक्रिय सहभाग घ्यावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‎                कार्यक्रमास भाजपा प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, भाजपा जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा सुरज गुप्ता, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, भाजपा ज्येष्ठ नेते शंकर लालसरे, भाजपा तालुकाध्यक्ष मारेगाव अविनाश लांबट यांच्यासह अन्य मान्यवर, सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‎                  स्पर्धेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून खेळाडूंनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत वातावरण रंगतदार केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad