Type Here to Get Search Results !

आमदार देरकर यांनी दिलेला शब्द पाळला; रस्त्याच्या कामास मुहूर्त

वणी :

‎          तालुक्यातील सावर्ला ते कोणा या प्रलंबित रस्त्याच्या कामास अखेर मुहूर्त लागला असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना २०२५-२६ अंतर्गत या महत्त्वपूर्ण रस्त्याचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले.



‎           कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून संजय नि. देरकर (आमदार, वणी विधानसभा व संपर्क प्रमुख, चंद्रपूर वणी-आणी लोकसभा क्षेत्र) यांनी उपस्थित राहून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.



‎           सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सावर्ला व कोणा परिसरातील नागरिकांना दर्जेदार व पक्का रस्ता उपलब्ध होणार असून दळणवळण अधिक सोयीस्कर होईल. यामुळे शैक्षणिक, आरोग्य व आर्थिक दृष्टीनेही परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे.


‎                 या प्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमात ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad