Type Here to Get Search Results !

‎जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूल, रासा येथे शिवजयंती प्रेरणादायी वातावरणात साजरी

वणी :

‎           जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राहुलजी देरकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


‎        या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मानकर मॅडम, सुषमा गोहोकार ताई, निंदेकर ताई, मीराताई पोतराजे, वर्षा उरकुडे मॅडम तसेच उरकुडे सर यांची विशेष उपस्थिती लाभली.


‎      कार्यक्रमाचे सुंदर आणि शिस्तबद्ध संचलन पिदुरकर मॅडम यांनी केले. प्रास्ताविक वरारकर मॅडम यांनी सादर करून शिवजयंतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाच्या शेवटी समीक्षा मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.


‎          यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली. तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.


‎        हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रमोद सर, जवादे मॅडम, मून मॅडम, पोटे मॅडम, कोटरंगे मॅडम आणि तृप्ती मॅडम यांनी विशेष सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि प्रेरणा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad