Type Here to Get Search Results !

वणी खून प्रकरणात आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी

वणी :

‎             शहरातील बाकडे पेट्रोल पंप परिसरात घडलेल्या खून प्रकरणात आरोपीस न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीला अटक केली.

‎          मृतक मल्लेश संजय नेरकुंटलावार (वय 24) याचा त्याचाच मित्र मंगेश उर्फ भुऱ्या विलास डाखरे (वय 26) याने पैशांच्या वादातून खून केल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या ₹7000 रकमेवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. हा वाद 18 फेब्रुवारी रोजी रात्री उफाळून आला आणि आरोपीने लोखंडी सळईने मल्लेशवर हल्ला केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.


‎          घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला रुग्णालयात हलवले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली. यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता, पुढील तपासासाठी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली.


‎         ही संपूर्ण कारवाई एसडीपीओ सुरेश दळवे व ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली API प्रियंका चौधरी, कपील पाटील, दत्ता पेंडकर, PSI सुयोग महापुरे, सुदाम आसोरे, शुभम महानवर तसेच वणी पोलीस स्टेशनच्या इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली.


‎     या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल असून, पुढील तपास API प्रियंका चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image