Type Here to Get Search Results !

तरुणांच्या सुरक्षेसाठी आमदार संजय देरकर यांची ‘झिरो टॉलरन्स’ नीती ‎

वणी :

‎             शहर व परिसरातील तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी अमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविण्यात येणार असल्याची घोषणा आमदार संजय देरकर यांनी केली आहे.


‎          याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, वणी परिसरात अमली पदार्थांची विक्री किंवा सेवन आढळल्यास संबंधितांवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. यासाठी पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांना स्पष्ट आदेश देण्यात आले असून कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही.



‎            पुढे ते म्हणाले की, हा विषय केवळ प्रशासनापुरता मर्यादित नसून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनीही यामध्ये सक्रिय सहभाग घेत सतर्क राहणे गरजेचे आहे. परिसरात कुठेही अवैध प्रकार आढळल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.


‎         “अमली पदार्थांच्या विळख्यातून वणीला मुक्त करणे हेच आपले ध्येय असून, भविष्यासोबत खेळ करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही,” असा इशाराही आमदार देरकर यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad