Type Here to Get Search Results !

‎अंकुश बोढे यांच्या नेतृत्वाखाली अडेगाव शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र ‎

झरी : 

‎       अडेगाव येथील ३७ शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येवर अखेर आवाज उठवण्यात आला असून, या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी थेट झरी तहसील कार्यालय गाठून प्रशासनासमोर आपली व्यथा मांडली.

‎            शेतकऱ्यांनी सांगितले की, रस्ता नसल्यामुळे शेतीची सर्व कामे ठप्प झाली असून मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर अंकुश बोढे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना जोरदार पाठिंबा देत प्रशासनाला इशारा दिला की, “शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मार्ग तात्काळ मिळाला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.”

‎         यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनीही एकजूट दाखवत आपल्या हक्कासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तहसील कार्यालय परिसरात घोषणाबाजी करत “शेतकरी मजबूत तर देश मजबूत” हा नारा देत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad