Type Here to Get Search Results !

संतांच्या विचारांनी समाज उजळतो; माजी आमदार बोदकुरवार यांचे प्रतिपादन

 

वणी : 

‎                  तालुक्यातील तरोडा येथे संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि विश्वसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विश्वव्यापीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली.


‎             या सोहळ्याचे उद्घाटन माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. आपल्या मनोगतात त्यांनी संतांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत, “संतांचा विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हेच खरे अभिवादन आहे,” असे सांगितले. स्वच्छता, समाजप्रबोधन, शिक्षण आणि मानवसेवा या मूल्यांवर आधारित जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


‎          संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी पुढे सांगितले की, आजच्या बदलत्या काळातही संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे विचार समाजाला दिशा देणारे आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान आणि सामाजिक एकजूट यासाठी त्यांच्या कार्याचा आदर्श घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

‎            या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर, विविध मान्यवर, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात संतांच्या विचारांचे स्मरण करत समाजजागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad