Type Here to Get Search Results !

शहरात विषारी दारूचा खेळ उघड; मोठा साठा जप्त, आरोपी पसार ‎


वणी : 

‎             शहरालगतच्या लालगुडा गावातील स्मशानभूमीजवळील दुमजली इमारतीत सुरू असलेल्या बनावट देशी दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी दुपारी धाड टाकली. या कारवाईत सुमारे २ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

‎             झडतीदरम्यान ‘रूपेश संत्रा’ ब्रँडचे बनावट स्टिकर लावलेल्या ९० मिलीच्या ३६०० शिश्या (अंदाजे किंमत १.६२ लाख रुपये) आढळून आल्या. तसेच रिकाम्या बाटल्या, झाकण, प्लास्टिक ड्रम, पॅकिंग साहित्य आणि दोन दुचाकी व एक मोपेड जप्त करण्यात आली.

‎ 

‎        कारवाईदरम्यान सूरज लोडे (रा. वेळाबाई) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने कारखाना श्याम भरत मेश्राम याचा असल्याची माहिती दिली. मात्र मुख्य आरोपी मेश्राम हा कुटुंबासह फरार झाला आहे.

‎         ही कारवाई उत्पादन शुल्क निरीक्षक पी. एस. बोढारे (पांढरकवडा), भरारी पथक प्रभारी निरीक्षक डी. एस. त्रिपाठी, उपनिरीक्षक एस. एल. बोढेवार, एस. एम. बुटले तसेच यवतमाळ येथील उपनिरीक्षक डी. डी. वाळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image