Type Here to Get Search Results !

संजय खाडे यांच्याकडून प्रतिभाताई धानोरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 


वणी : 

         ‎ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव, तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या., मुंबई येथील संचालक आणि जय जगन्नाथ मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., वणीचे संस्थापक अध्यक्ष संजय रामचंद्र खाडे यांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

       ‎ आपल्या शुभेच्छा संदेशात श्री. खाडे यांनी म्हटले आहे की, “खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे कार्य हे नेहमीच जनतेच्या हितासाठी, विशेषतः ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी समर्पित राहिले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे चंद्रपूर–वणी–आर्णी लोकसभा क्षेत्रात विकासाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. त्यांनी शिक्षण, आरोग्य, शेती आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत केलेले कार्य उल्लेखनीय आहे.”

‎        तसेच त्यांनी पुढे म्हटले की, “त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आगामी काळात अधिकाधिक यश लाभो. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास होत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”

‎      खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिक, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संस्थांकडूनही त्यांना शुभेच्छा देण्यात येत असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad