Type Here to Get Search Results !

रायगडावर स्वच्छतेची मानवंदना : संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त वणीच्या शिवसैनिकांचे प्रेरणादायी अभियान ‎

वणी :

‎           रायगड किल्ला येथील पायथ्याशी आज संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त एक प्रेरणादायी आणि समाजप्रबोधन करणारे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. वणी येथील शिवसैनिकांनी एकत्र येत स्वच्छतेचा संदेश कृतीतून देत दोन महान विभूतींना अनोखी मानवंदना अर्पण केली.

‎         हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीच्या पवित्र भूमीत झाडू हाती घेत, “स्वच्छता हाच खरा धर्म” हा संत गाडगे बाबा यांचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकारण्यात आला.

‎     शिवरायांनी दिलेला स्वाभिमान, स्वराज्य आणि शिस्तीचा आदर्श तसेच संत गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छता, समाजप्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश यांचा संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला.

       ‎ या स्वच्छता अभियानात युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, मा. शहर प्रमुख राजु तुरणकर, मा. जिल्हा परिषद सदस्य बंडु चांदेकर, तसेच नंदू ढूमने, दिवाकर नागतुरे, अरविंद कापसे, मनिष बतरा, परशुराम पोटे, चेतन उलमाले, मिलिंद बावणे, आदित्य नामेश बिलोरीय, श्रीकांत यशवंत उके, रौनक रवी बिलोरीया, सुयेश नगराळे, संजोग झाडे, तुषार दुरुटकर या वणीतील शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

       ‎ केवळ जयंती साजरी न करता, कृतीतून महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. “गड स्वच्छ – विचार शुद्ध – समाज जागृत” या घोषवाक्यासह उपस्थितांनी समाजाला स्वच्छता आणि जागरूकतेचा आदर्श दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad