Type Here to Get Search Results !

२५ वर्षांची परंपरा कायम : वणीत हास्य कवी संमेलनाचे आयोजन


‎वणी : 

‎               अ.भा. अति दिड शहाणे सम्मेलन समिती, वणी यांच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून धुलिवंदनाच्या दिवशी हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीही हा परंपरागत कार्यक्रम ३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता शासकीय मैदान, पाण्याच्या टाकीजवळ, वणी येथे आयोजित करण्यात आला आहे.


‎              या हास्य कवी संमेलनात देशभरातील प्रसिद्ध कवी आपली उपस्थिती दर्शवणार आहेत. यात शशीकांत यादव (मध्यप्रदेश), सरदार प्रताप फौजदार (नवी दिल्ली), सुश्री सोनल जैन (सुरत), अमित शुक्ला (प्रयागराज, उत्तर प्रदेश) आणि दिनेश देशी घी (शाजापूर) यांचा समावेश आहे.

‎            या कार्यक्रमाचा श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक राजू उंबरकर, राकेश खुराणा, रवि बेलुरकर, निकेश गुप्ता, प्रदीप बोनगिरवार, आशिष खुलसंगे, डॉ. महेंद्र लोढा, भिकमचंद गोयनका, दीपक छाजेड, बंटी खुराणा, तुषार अतकरे आणि रमेश तांबे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad