Type Here to Get Search Results !

मारेगावात तरुणाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा


मारेगाव :

‎            तालुक्यात रविवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या एका वेदनादायी प्रसंगामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुण संकेत शशिकांत कोरले याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. 


‎             मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण काही महिन्यांपासून मारेगाव येथे राहत होता. रविवारी दुपारी घरात एकटाच असताना गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.


‎         संकेत हा शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर घराची जबाबदारी आई व त्याच्यावर आली होती. आई शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. त्याची धाकटी बहीण उमरी येथे नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. संकेत स्वतः यवतमाळ येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता.


‎            या घटनेमुळे कोरले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad