Type Here to Get Search Results !

लोखंडी सलाखेने प्राणघातक हल्ला; वणीत युवक ठार

वणी :

‎            “पैसे दे… नाहीतर परिणाम भोग!” या वादातून अखेर रक्त सांडले आणि मैत्रीचे नाते थेट खुनात बदलले. वणी तालुक्यातील बाकडे पेट्रोल पंपाजवळ घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.


‎        मृतक मल्लेश संजय नेरकुंटलावार (२४) याचा त्याचाच जिवलग मित्र मंगेश उर्फ भुऱ्या विलास डाखरे (२६) याने लोखंडी सलाखेने डोक्यावर सपासप वार करत अक्षरशः ठेचून ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


‎        मिळालेल्या माहितीनुसार, मल्लेशने आरोपी मंगेशकडे सुमारे ७,००० रुपये दिले होते. हे पैसे परत मागितल्यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. घटनेच्या दिवशी दुपारीच दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता आणि हा वाद रात्री थेट रक्तरंजित शेवटाला पोहोचला.


‎           १८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास, संजय ऑटोमोबाईल दुकानासमोर मंगेशने मल्लेशला अडवून लोखंडी सलाखेने डोक्यावर जोरदार वार केले. हल्ला इतका भीषण होता की मल्लेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.


‎        घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी कलम १०३(१) BNS अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


‎       मृतकाचा भाऊ राजेश नेरकुंटलावार (२२) यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तपास सपोनि प्रियांका चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad