Type Here to Get Search Results !

धारदार हत्याराने हल्ला; शेजारीच ठरला जीवघेणा शत्रू

झरी :

‎          तालुक्यातील शिबला येथे १६ फेब्रुवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. शेजाऱ्यांमधील वादातून संतोष टेकाम (वय अंदाजे ४५) यांच्यावर धारदार सुऱ्याने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला. या घटनेत मध्यस्थी करण्यास आलेली त्यांची पत्नीही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत.


‎        आरोपी शालिक आत्राम (वय अंदाजे ३५) याने संतोष टेकाम यांच्यावर वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेनंतर गावात तणाव व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


‎         पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


‎     ग्रामीण भागात वाढत्या किरकोळ वादांमुळे गंभीर हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad