Type Here to Get Search Results !

परवान्याविना रेती वाहतूक महागात; ₹4 लाखांचा ट्रॅक्टर जप्त

वणी  :

‎            शहराजवळील वाघदरा-वणी मार्गावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत चालकासह मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली.

‎        मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गस्तीदरम्यान गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली होती की, एक ट्रॅक्टर (क्र. MH29 BW2296) अवैधरित्या रेती वाहतूक करीत आहे. या माहितीच्या आधारे तात्काळ पथकाने वाघदरा-वणी मार्गावर सापळा रचला.

‎         दरम्यान, संशयित ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता ट्रॉलीमध्ये अंदाजे १ ब्रास रेती (किंमत सुमारे ₹6000) आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. चालकाचे नाव पंकज राम गौरकार (वय 30, रा. वणी) असे असून त्याच्याकडून अंदाजे ₹4,00,000 किंमतीचा ट्रॅक्टर व ट्रॉली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

‎       या प्रकरणी कलम 303(2) भा.न्या.सं. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48(8) अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. या कारवाईमुळे परिसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad