Type Here to Get Search Results !

दुपारी रंगला डाव, संध्याकाळी गुन्हा दाखल; जुगारबाजांवर पोलिसांचा वचक

वणी : 

‎        शहरातील रंगारीपुरा परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत सात जणांना रंगेहात पकडले. दि. 11 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3.35 ते 4.00 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

‎      मिळालेल्या माहितीनुसार, विवेक नारायण उके (रा. रंगारीपुरा) यांच्या राहत्या घरात 52 पत्त्यांच्या गंजीवर पैशांचा हारजीतचा जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकत जुगाराचा अड्डाच उद्ध्वस्त केला. घटनास्थळी आरोपी जुगार खेळताना आढळले.

‎       घरातून 52 पत्त्यांची गंजी व 1,650 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपींकडून एकूण 7,220 रुपये रोख जप्त करण्यात आले. अशा प्रकारे एकूण 8,870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

‎         या कारवाईत विवेक उके, शेख रफिक शेख मेहबुब (रा. पंचशील नगर), अशोक नागदिवे (रा. फाले लेआऊट), गणपत वाढई (रा. आवारी लेआऊट), प्रकाश कोंडमवार (रा. सरोदे चौक), सुमित कोनप्रत्तीवार (रा. प्रगती नगर) आणि सिद्धार्थ चवरे (रा. सेवानगर) यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‎     शहरात बेकायदेशीर कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा वणी पोलिसांनी दिला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी विशाल राठोड करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad