अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमद्वारे संचालित श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा गुरुदेव सेवा मंडळ, विठ्ठलवाडी, वणी (मुख्य शाखा) तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट, विठ्ठलवाडी, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने वणी येथे राज्यस्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धा २०२६ तसेच जाहीर किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ब्रम्हलीन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त, सर्व संत स्मृती दिन व मानवता दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील ग्रामीण व शहरी विभागासाठी आयोजित करण्यात येत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत जाहीर किर्तनाने होणार असून या किर्तनसेवेचा लाभ ह.भ.प. श्री शुकदासजी उ. गाडेकर महाराज, राष्ट्रीय किर्तनकार (मु.पो. पाटसुल (रेल्वे), ता. आकोट, जि. अकोला) देणार आहेत.
राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा दि. २३ जानेवारी २०२६ ते रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध भागातून नामवंत भजन मंडळे सहभागी होणार असून भक्ती, संस्कार व सांस्कृतिक परंपरेचा जागर करण्यात येणार आहे. या भव्य कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या