वणी :
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वणी विधानसभा क्षेत्रात भव्य व आक्रमक स्वरूपाचे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या सर्व कार्यक्रमांचे केंद्रबिंदू ठरले आमदार संजय देरकर, ज्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणि सामाजिक बांधिलकी ठळकपणे समोर आली.
वणी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकस्थळी आमदार संजय भाऊ देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांनी जोशपूर्ण अभिवादन केले. “बाळासाहेबांचा विचार, शिवसेनेचा निर्धार” या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला होता.
आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या पुढाकाराने वणी येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. युवकांमध्ये ऊर्जा आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. तसेच शहरप्रमुख विनोद ढूमने व सुधीर थेरे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय दवाखान्यात रुग्णांना फळांचे वाटप करून शिवसेनेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करण्यात आली.
मारेगाव येथे तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुट्टे यांच्या नेतृत्वाखाली सरकारी दवाखान्यात रुग्णांना फळवाटप करण्यात आले, तर झरी येथे समीर लेंनगुळे व मंगेश मोहितकर यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे उपक्रम म्हणजे शिवसेना ही केवळ राजकीय पक्ष नसून समाजासाठी लढणारी चळवळ आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
याच प्रसंगी आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. युवकांचा वाढता उत्साह पाहता वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले.
या सर्व कार्यक्रमांना आमदार संजय देरकर यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय निखाडे, उपजिल्हाप्रमुख दीपक कोकास, विधानसभा प्रमुख सुनील कातकडे, रवी बोढेकर, गणपत लेडांगे, आयुष ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर व शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या