हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सु. शेंडे यांच्या कणखर, नियोजनबद्ध आणि प्रेरणादायी नेतृत्वाखाली भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला (शिवतीर्थ) हार अर्पण करून भगवा ध्वज फडकावत या स्पर्धेची दमदार सुरुवात झाली.
या मॅराथॉन स्पर्धेत युवक, महिला, बालक व क्रीडाप्रेमी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. विशेषतः मुलांच्या गटात जबरदस्त चुरस आणि लढतीची भावना पाहायला मिळाली. ओपन गटातील मुलांमध्ये विरोचन गोडे याने प्रथम क्रमांक पटकावला, तर सौरभ दरणे याने द्वितीय, शिवम जंगठे याने तृतीय आणि पियूष पडलमवार याने चतुर्थ क्रमांक मिळवला. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात शिवम ओझा याने प्रथम क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. शिवम कुइटे याने द्वितीय, सुमित ढेंगळे याने तृतीय तर अयान सिद्दिकी याने चतुर्थ क्रमांक पटकावला.
या सर्व मुलांनी दाखवलेली जिद्द, शिस्त आणि चिकाटी ही मैदानात उतरून काम करणाऱ्या युवानेतृत्वाचे – अजिंक्य सु. शेंडे यांच्या मार्गदर्शनाचे ठळक उदाहरण असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
स्पर्धा चार गटांमध्ये पार पडली असून विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे व आकर्षक मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध नियोजन, सुरक्षितता आणि उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले. हा उपक्रम मा. आमदार संजयभाऊ देरकर व किरणताई देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख संजयजी निखाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नव्याने निवडून आलेले नगरसेवक यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला.
युवकांमध्ये आत्मविश्वास, आरोग्याबाबत जागरूकता आणि संघटनात्मक ताकद निर्माण करणारे नेतृत्व म्हणून अजिंक्य सु. शेंडे हे वणी तालुक्यातील युवासेनेचे प्रभावी नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले. शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. यामध्ये डॉ. संचिताताई नगराळे, सुरेखाताई ढेंगळे, दीपक कोकास, सुनील कातकडे, गणपत लेडांगे, आयुष ठाकरे, रवी बोढेकर, विनोद दुमणे, सुरेश शेंडे, राजू तुराणकर, अजय चन्ने, विलास बोबडे, टिकाराम खाडे,बबन केळकर, राजू पाटील, चेतन उलमले, मिलिंद बावणे, संजोग झाडे, कुणाल खामकर, अक्षय लाडे व संस्कार हेपत यांची प्रमुख उपस्थिती होती.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या