येथील श्री जैताई मंदिरात सुरू असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे या धार्मिक सोहळ्याला विशेष शोभा आली.
पंडित मनु महाराज तुगनायत यांच्या ओघवत्या, रसपूर्ण व भावपूर्ण कथाकथनाचे संजय खाडे यांनी मनःपूर्वक श्रवण केले. श्रीमद् भागवत कथेतील भक्ती, सेवा व मानवतेचे संदेश समाजासाठी प्रेरणादायी असून अशा अध्यात्मिक उपक्रमांमुळे मानसिक शांती व सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कथा सप्ताहादरम्यान श्री भागवत सेवा समिती, वणी यांच्या वतीने संजय खाडे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. समाजहिताच्या, धार्मिक व सांस्कृतिक कार्यात सातत्याने सहभाग नोंदवणाऱ्या संजय खाडे यांच्या कार्याची आयोजकांनी प्रशंसा केली.
या प्रसंगी बोलताना संजय खाडे यांनी आयोजकांचे आभार मानत, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम समाजाला एकत्र बांधण्याचे कार्य करतात, असे सांगितले. वणी परिसरात सुरू असलेला हा भागवत कथा सप्ताह भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याचा सुंदर संगम ठरत असून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या