Type Here to Get Search Results !

“टिळक भवनात खाडेंचा दबदबा; सपकाळांचा ठाम पाठिंबा — काँग्रेस मोडमध्ये ‘मिशन विजय’”

‎वणी :

‎                  मुंबई येथील टिळक भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्यात महत्त्वपूर्ण व निर्णायक बैठक पार पडली. या भेटीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आक्रमक आणि ठोस रणनितीवर सखोल चर्चा झाली.

‎            अचलपूर मतदारसंघात प्रभारी म्हणून संजय खाडे यांनी केलेल्या जमिनीवर उतरून केलेल्या प्रभावी कार्याचा सविस्तर अहवाल यावेळी सादर करण्यात आला. संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क, आणि पक्षवाढीसाठी राबवलेल्या उपक्रमांची दखल घेत हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी कार्याबाबत समाधान व्यक्त केले.

‎             इतकेच नव्हे, तर “पक्षाच्या प्रत्येक लढाईत संजय खाडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहू” असा ठाम विश्वास सपकाळ साहेबांनी दिला. हा विश्वास म्हणजे संजय खाडे यांच्या नेतृत्वशक्तीची आणि कार्यक्षमतेची थेट पावती मानली जात आहे.

‎            येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करण्यासाठी आक्रमक रणनीती, मजबूत बूथ व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांचे प्रभावी नेटवर्क उभारण्याबाबत मौल्यवान मार्गदर्शन यावेळी मिळाले. या भेटीमुळे काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी एकजुटीने, नियोजनबद्ध आणि आक्रमक पद्धतीने काम करण्याचा निर्धार अधिक दृढ झाला आहे.

‎            संजय खाडे यांची सक्रियता, स्पष्ट भूमिका आणि संघटनात्मक पकड पाहता, येत्या काळात काँग्रेससाठी ते निर्णायक चेहरा ठरणार, हे स्पष्ट होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad