स्त्रीशिक्षणाचा दीप अखंड पेटवणाऱ्या, समाजक्रांतीची मशाल हाती घेणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ इंग्लिश मिडीयम स्कूल, रासा येथे प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. वर्षा अरविंद उरकुडे मॅडम होत्या.
कार्यक्रमाला सरपंच ग्रामरासा रत्नमालाजी ठावरी प्रमुख अतिथी म्हणून तर ज्येष्ठ शिक्षिका ज्योती जवादे विशेष उपस्थित होत्या. सावित्रीबाईंच्या शैक्षणिक, सामाजिक संघर्षावर उपस्थित मान्यवरांनी सडेतोड विचार मांडले.
कार्यक्रमाचे सशक्त व प्रभावी संचालन तृप्ती मॅडम यांनी केले. वरारकर मॅडम यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली, तर मंजू मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी निकिता मून मॅडम, निकिता कोटरंगे मॅडम, समीक्षा सोनटक्के मॅडम व राधिका पोटे मॅडम यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या