भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश चिं. बोढे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार व हितचिंतकांनी उपस्थित राहून अंकुश बोढे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच फोन, संदेश व सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी अंकुश बोढे यांच्या वतीने एक आभारपत्र प्रसिद्ध करण्यात आले. या पत्रात, “माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून, फोन करून, संदेश, पोस्ट व कॉलद्वारे प्रेमळ शुभेच्छा देणाऱ्या सर्व मान्यवर, आप्तेष्ट, मित्रपरिवार, सहकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार.
आपल्या प्रेम, आशीर्वाद व सदिच्छांमुळे हा दिवस अविस्मरणीय ठरला. हेच प्रेम व पाठबळ माझ्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे नमूद करण्यात आले आहे.
आपली साथ, विश्वास व प्रेम कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करत पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या