Type Here to Get Search Results !

कायदा समजून घेताना विद्यार्थी; वणी पोलीस स्टेशनचा पुढाकार

 वणी :

‎          पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून वणी पोलीस स्टेशन, जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने समाजप्रबोधन व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.

         ‎या उपक्रमांतर्गत इंटरनॅशनल ब्लॅक डायमंड स्कूल, आदर्श हायस्कूल, विवेकानंद विद्यालय, ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्र ,अभ्यासिका आंबेडकर चौक वणी शाळेला /कोचिंग क्लासेस ला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी भेट दिली तसेच आदर्श हायस्कूल शाळा भगतसिंग चौक शाळेतील विद्यार्थ्यांना वणी पोलीस स्टेशन येथे आमंत्रित करण्यात आले होते.

      यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील दैनंदिन कामकाज, तक्रार नोंद प्रक्रिया, तपास कार्यपद्धती, आपत्कालीन परिस्थितीत पोलीसांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.  तसेच विद्यार्थ्यांना महिला विषयक कायदे, सायबर गुन्हे, गुड टच – बॅड टच, बालसुरक्षा, नवीन कायदे व कायद्यातील बदल, आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक (112, 1091, 1098) याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

      ‎या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला व प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून कायद्याविषयी शंका निरसन करण्यात आले. सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण होऊन पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

‎       हा कार्यक्रम वणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गोपाल उंबरकर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक  पोलीस निरीक्षक प्रियंका चौधरी , स.पोलीस निरीक्षक कपिल पाटील , पीएसआय सुदाम आसोरे , पीएसआय अंकुश वडतकर, पीएसआय शुभम महानवर व पोलीस हेडकॉन्स्टेबल कावळे, पोलीस कॉन्स्टेबल शाम राठोड ,इमरान खान कर्मचारी यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad