Type Here to Get Search Results !

राजीनाम्यांवर उपसरपंच सुनील कातकडे यांची भूमिका

वणी :

‎               चिखलगाव ग्रामपंचायतीतील आठ सदस्यांच्या सामूहिक राजीनाम्यांमुळे निर्माण झालेल्या वादावर उपसरपंच सुनील कातकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी असल्याचे आरोप त्यांनी फेटाळून लावत, २०२२ पासून सर्व सदस्य एकाच विचारसरणीखाली गावाच्या विकासासाठी एकत्र काम करत असल्याचा दावा केला आहे.


‎         आरक्षणानुसार पदांचे वाटप सर्वानुमते झाले असून गेल्या तीन वर्षांत ग्रामसभा व मासिक सभांमधून गावातील समस्या सोडवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. मतभेद स्वाभाविक असले तरी निधी व मनुष्यबळाच्या मर्यादेत समतोल विकासाचा प्रयत्न करण्यात आल्याचे कातकडे यांचे म्हणणे आहे.

‎          दरम्यान, विरोधकांनी मतभेदांचा गैरफायदा घेत दबाव टाकून राजीनामे घडवून आणल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीचा कारभार लोकशाही व पारदर्शक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad