वणी :
श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज (विदर्भ), नागपूर संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. ४ जानेवारी २०२६) नागपूर येथे भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील कलावंत, साहित्यिक व संपादक डॉ. विनोदकुमार आदे यांना २०२६ चा समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कला, साहित्य, संशोधन व समाजप्रबोधन क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन व भरीव कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी विविध सामाजिक विषयांवर आधारित त्यांच्या सर्जनशील कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा जागर करत समाजातील तरुणांनी शिक्षण, कला व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या महोत्सवाला समाजबांधवांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या