डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, वणी यांच्या वतीने नामांतर दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मंचाच्या वतीने बंडू कांबळे, संजय तेलंग, घनश्याम ठमके, प्रा. पुरुषोत्तम पाटील, रामदास कांबळे, गोवर्धन तेलतुंबडे आदींनी पुष्पहार अर्पण केला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी नामांतर लढ्याचा इतिहास उलगडून सांगितला. २७ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव एकमुखाने मंजूर केला होता. मात्र, या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी १४ जानेवारी १९९२ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली, असे त्यांनी नमूद केले
या १४ वर्षांच्या प्रदीर्घ काळात अनेकांना बलीदान द्यावे लागले. पोचीराम कांबळे, प्रतिभा तायडे, जनार्दन मवाडे, सुहासिनी बनसोडे, गौतम वाघमारे, दिलीप रामटेके, चंदर कांबळे यांसह असंख्य नामांतर शहीदांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेक कुटुंबांची घरे उद्ध्वस्त झाली. देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने १५ विद्यापीठे असतानाही त्यांच्या कर्मभूमीत त्यांच्या नावासाठी इतका विरोध झाला, ही बाब चिंतन करण्यासारखी आहे, असेही प्रा. पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाला मंचाचे अध्यक्ष बंडूजी कांबळे, उपाध्यक्ष द्वय संजय तेलंग व घनश्याम ठमके, कोषाध्यक्ष रामदास कांबळे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, गोवर्धन तेलतुंबडे, दिगंबर पुणवटकर, मनोहर ठमके, कवडू जीवने, पुंडलिक पथाडे, पुंजाराम भादीकर, वसंत नगराळे, दादासाहेब घडले, देवानंद झाडे, उल्हास पेटकर आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या