सन २०२५ मध्ये वणी पोलीस स्टेशनने गुन्हेगारीविरोधात थेट आक्रमक भूमिका घेत गुन्हेगारांना जोरदार दणका दिला आहे. वर्षभरात एकूण ७८५ गुन्हे दाखल झाले असले तरी पोलिसांच्या वेगवान तपासामुळे बहुसंख्य गुन्हे उघडकीस येत गुन्हेगारांचे मनोबल खच्ची झाले आहे.
गंभीर गुन्ह्यांकडे पाहता खुनाचे ६, खुनाचा प्रयत्न २, दरोडा १, जबरी चोरी १, घरफोडी १९, चोरी ७१, दुखापतीचे ६३ तसेच प्राणांकीत अपघाताचे ३५ गुन्हे दाखल झाले. दारूबंदी अंतर्गत ६७, जुगाराचे १०८ आणि इतर ४४९ गुन्ह्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या आकडेवारीतूनच वणी पोलिसांचा वाढता दबदबा स्पष्ट दिसून येतो.
भाग १ ते ५ अंतर्गत नोंद असलेल्या ३०० गुन्ह्यांपैकी तब्बल २४७ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून गुन्हे उघडकीचे प्रमाण अत्यंत समाधानकारक आहे. केवळ ३१ गुन्हे तपासावर प्रलंबित असून त्याचे प्रमाण अवघे १०.३३ टक्के आहे. यावरून पोलिसांची कार्यक्षमता आणि तपासातील काटेकोरपणा ठळकपणे अधोरेखित होतो.
मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्येही वणी पोलिसांनी गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले आहे. घरफोडीच्या १९ गुन्ह्यांपैकी १० गुन्हे उघडकीस आणून चोरीस गेलेल्या ४३,७३,८१७ रुपयांपैकी १६,३१,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच चोरीच्या ७१ गुन्ह्यांपैकी ३६ गुन्हे उघडकीस आणून १,०६,९६,२०६ रुपयांच्या चोरीपैकी ७४,७२,३५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले. एकूण मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये ६३ टक्के मुद्देमाल हस्तगत होणे ही वणी पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीची ठळक पावती आहे.
गुन्हेगारीविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेत वणी पोलिसांनी २०२५ मध्ये ठोस आणि आक्रमक कारवाई करत कायद्याचा दरारा निर्माण केला आहे. गुन्हेगारांना मोकळे रान मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा या कामगिरीतून वणी पोलिसांनी दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या