वणी :
स्त्रीशिक्षणाची ज्योत अखंड पेटवणाऱ्या, सामाजिक परिवर्तनाच्या अग्रदूत सावित्रीआई फुले यांची जयंती आज शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी वणीत सन्मानपूर्वक साजरी होत आहे. जिजाऊ ब्रिगेड, वणी यांच्या वतीने आयोजित दशरात्रोत्सव २०२६ अंतर्गत हा जयंती उत्सव सायंकाळी ठीक ६ वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय, विठ्ठलवाडी, वणी येथे पार पडणार आहे.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचे अध्यक्षपद जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मा. पोर्णिमाताई भोंगळे भूषविणार असून मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय विद्यालय, मारेगांव येथील शिक्षिका मा. सोनालीताई जेनेकार उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या विचारांतून सावित्रीआईंच्या कार्याचा सामाजिक आशय उलगडणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघ, वणीचे अध्यक्ष मा. अंबादास वागदरकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाचे अध्यक्ष मा. प्रा. बाळकृष्ण राजुरकर तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष व वणी नगरपरिषदेचे नगरसेवक मा. अजय धोबे यांची उपस्थिती लाभणार आहे. विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि विचारवंत यामुळे कार्यक्रमास वैचारिक बळ प्राप्त होणार आहे.
जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमातून सावित्रीआई फुले यांचे शिक्षण, समानता व सामाजिक न्यायाचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त होणार आहे.
आज सायंकाळी होणाऱ्या या जयंती उत्सवाला वणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सावित्रीआई फुले यांना अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या