धनोजे कुणबी समाज संस्था, वणी यांच्या वतीने धनोजे कुणबी समाज भवन येथे दि. १५ व १६ जानेवारी २०२६ रोजी सद्गुरु जगन्नाथ महाराज मूर्ती प्रतिस्थापना दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांनी भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दि. १५ जानेवारी रोजी सायंकाळी सामुदायिक प्रार्थना व वारकरी भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दि. १६ जानेवारी रोजी सकाळी सद्गुरु जगन्नाथ महाराज मूर्तीचे विधिवत पूजन व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शेतकरी नगर येथून सद्गुरुंची पालखी भक्तीमय वातावरणात काढण्यात आली.
कार्यक्रमात पांढरकवडा येथील अशोक गौरकर सर यांनी संत साहित्याचे महत्त्व आपल्या प्रभावी प्रवचनातून विशद केले. यावेळी समाजातील ज्येष्ठ नेते महेश पावडे पाटील (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय धनोजे कुणबी समाज संस्था) यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच प्रमोद भाऊ वासेकर (नवनियुक्त अध्यक्ष, वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्ट्री, वणी) यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनोजे कुणबी समाज संस्था, वणी चे अध्यक्ष मंगेश रासेकर होते. प्रमुख उपस्थितीत वणी विधानसभा आमदार संजय भाऊ देरकर, उद्घाटक रुपाली ताई सुनील कातकडे (सरपंच, ग्रामपंचायत चिखलगाव), विशेष अतिथी संजय भाऊ खाडे (संचालक, पणन महासंघ, मुंबई), प्रमुख अतिथी किरण ताई देरकर (अध्यक्ष, एकविरा महिला पतसंस्था, मारेगाव) व संगीताताई खाडे (अध्यक्ष, ध.कु. महिला विकास संस्था, वणी) यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी समाजातील उत्कृष्ट सरपंच म्हणून डिमनताई टोंगे (वनोजा–देवी) व गीता महेश पावडे (सरपंच, सुकनेगाव) तसेच समाजसेविका स्मिताताई नांदेकर यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे बहारदार संचालन रुद्रापाटील कुचनकर यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव अंबादास वागदरकर यांनी, तर आभार प्रदर्शन नितीन मोवाडे सर यांनी केले. सत्कार समारोपानंतर काल्याचे कीर्तन, दहीहंडी फोडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. विविध भागातून आलेल्या भजन मंडळांच्या स्पर्धांनी कार्यक्रमाला रंगत आणली. सायंकाळी विठ्ठल-रुख्मिणी हरिपाठ मंडळ यांच्या हरिपाठ सादरीकरणाने उपस्थित भाविकांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे मार्गदर्शक अभय पानघाटे, नामदेवराव जेणेकर, भास्करराव सोमलकर, रामराव गोहोकर, कवडू नागपूरे, प्रभाकर गौरकर, नरेंद्र मिलमीले, एकरे सर, दिगंबर गोहोकर, बाळासाहेब राजूरकर, जयप्रकाश राजूरकर, किशोर मिलमीले, तेजे पाटील, सीमाताई देवाळकर, शारदाताई गोहोकर, रेखाताई उपरे व परिसरातील भावीक मोठया संख्येने उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या