Type Here to Get Search Results !

वणीत किरकोळ वादातून रक्तपात – नागरिकांमध्ये प्रचंड भीती

वणी : 

‎             शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस बेफाम होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, पन्नास रुपयांच्या किरकोळ वादातून एका मजुरावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री दारूभट्टीसमोर, लोकवस्तीच्या परिसरात घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

‎       मिळालेल्या माहितीनुसार, जखमी व्यक्ती हा दारूभट्टीवर काम करणारा मजूर असून, आरोपी हा परिसरातील तरुण आहे. घटनेदरम्यान आरोपीने आधी शिवीगाळ करून जिवे मारण्याची उघड धमकी दिली आणि काही मिनिटांतच हातात चाकू घेऊन परत येत थेट हल्ला चढवला. हल्ल्यावेळी मजुराने स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हाताला गंभीर जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. लोकांसमोरच घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

‎        वणी पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम 351(3), 351(2), 352 आणि 118(1) अन्वये गंभीर गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

‎            किरकोळ वादातून चाकू बाहेर निघत असेल तर सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का?  दारूभट्ट्यांभोवती वाढणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण कोण करणार ? या घटनेमुळे वणी शहरात भीती व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad