वणी :
वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापिका सौ. अश्लेषा जेनेकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अभय पारखी आणि ज्येष्ठ शिक्षक श्री. सतीश बाविस्कर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गणिताचे महत्त्व अधोरेखित करणारी प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडविण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी ‘I’m Samarth’ या गणितीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या तार्किक विचारांना चालना देण्यासाठी गणित प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. सतीश बाविस्कर यांनी गणितज्ञ रामानुजन यांच्या गणित क्षेत्रातील अमूल्य योगदानावर प्रकाश टाकत, राष्ट्रीय गणित दिवस हा संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा दिवस असल्याचे सांगितले. श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव श्री. ओमप्रकाशजी चचडा व सदस्य श्री. विक्रांतजी चचडा यांनीही विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन कु. आफरीन अंसारी व कु. पलक रेवती यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. जिगीषा कुडमेथे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणित शिक्षिका कु. तेजस्विनी झाडे, कु. प्रगती वरहाटे, कु. चेतना लोडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या