मुकूटबन :
महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ (महाराष्ट्र राज्य संलग्नित) यवतमाळ जिल्हा गणित अध्यापक मंडळ, यवतमाळ तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक), यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणित संबोध परीक्षा–२०२५ ही १३ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत सुमारे १८,५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या परीक्षेत झरी तालुक्यातील आर्या इंटरनॅशनल स्कूल, मुकूटबन येथील इयत्ता ५ वी मधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. यज्ञा विक्रम आसुटकर आणि तनिष्का संजय बरपटवार यांनी १०० पैकी ९६ समान गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तर आरोही आतिश कडू हिने ८८ गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा सोमवार, २२ डिसेंबर २०२५ रोजी यवतमाळ येथील उबुंटू इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित समारंभात गौरव करण्यात आला. माननीय श्री प्रकाश मिश्रा (शिक्षणाधिकारी, प्राथमिक), श्री रविंद्र कटोलकर (शिक्षणाधिकारी, माध्यमिक), श्री किशोर पागोरे (शिक्षणाधिकारी, योजना) तसेच डॉ. श्री रमेश राऊत (प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, यवतमाळ) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मुख्याध्यापक तसेच शाळेच्या सर्व शिक्षकवृंदाला दिले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या