Type Here to Get Search Results !

वणी शहरात चर्चा एकच — प्रभाग क्र. 11 च्या विजयाचा चेहरा अंकुश बोढे

 वणी : 

            वणी नगर पालिका निवडणूक 2025 मध्ये संपूर्ण शहराचे लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवत राजकीय इतिहास घडवला आहे. या प्रभागातील दोन्ही जागांवर भाजपचा झेंडा फडकला असून, या विजयामागील प्रमुख शिल्पकार म्हणून अंकुश बोढे यांचे नाव ठळकपणे पुढे आले आहे.

      या अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढतीत प्रचार प्रभारी म्हणून अंकुश बोढे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र त्यांनी ही जबाबदारी केवळ पार पाडली नाही, तर अत्यंत नियोजनबद्ध, आक्रमक आणि प्रभावी प्रचारयंत्रणा उभी करत विरोधकांना अक्षरशः नामोहरम केले. घराघरात पोहोचलेला प्रचार, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलेली ऊर्जा, मतदारांशी थेट संवाद आणि संघटनावर असलेली मजबूत पकड — या साऱ्यामुळे प्रभाग 11 मध्ये भाजपचा विजय अटळ ठरला.

      राजकीय जाण, नेतृत्वगुण आणि कार्यकर्त्यांशी असलेली नाळ यामुळे अंकुश बोढे हे या विजयाचे खरे ‘हिरो’ ठरले, अशी चर्चा आज संपूर्ण वणी शहरात आहे.

        या प्रभागातील विजयी उमेदवार सौ. रेखा कोवे व श्री. लवलेश लाल यांनी मतदारांचे मनःपूर्वक आभार मानत, “हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि संघटनाच्या ताकदीचा आहे” अशी भावना व्यक्त केली.

       तसेच या विजयासाठी मार्गदर्शन करणारे मा. संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब आणि शहर प्रमुख नीलेश चौधरी यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले असून, त्यांनी दाखवलेला विश्वास हा अंकुश बोढे यांच्या नेतृत्वात सार्थ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

हा विजय केवळ एका प्रभागापुरता मर्यादित नसून, वणीच्या राजकारणात भाजपच्या ताकदीची आणि पुढील विकासाच्या दिशेची स्पष्ट घोषणा असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

      प्रभाग 11 चा विजय म्हणजे अंकुश बोढे यांच्या नेतृत्वशैलीवर उमटलेली जनतेची मोहर आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad