Type Here to Get Search Results !

पराभव, राजीनामा आणि प्रश्नचिन्हे; वणी काँग्रेसपुढे अस्तित्वाचे आव्हान

वणी  :

  वणी शहर काँग्रेसमध्ये सध्या अभूतपूर्व राजकीय उलथापालथ सुरू असून, नगरपालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर वणी शहर काँग्रेस अध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.


    नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र निकालाने काँग्रेसचे दावे फोल ठरवले. मतदारांनी काँग्रेसवर विश्वास दाखवला नाही, हे वास्तव आता पक्षाला स्वीकारावे लागले आहे. शहराध्यक्ष या नात्याने संपूर्ण निवडणूक जबाबदारी असतानाही अपेक्षित यश न मिळाल्याने डॉ. लोढा यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे. राजीनामा पत्रात वैद्यकीय क्षेत्रातील वाढत्या जबाबदाऱ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.


      या राजीनाम्यामुळे वणी शहरातील काँग्रेस संघटनेची अंतर्गत कमजोरी, गटबाजी आणि नेतृत्वाचा अभाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. कार्यकर्त्यांमधील नाराजी, समन्वयाचा अभाव आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका न घेता आल्याने काँग्रेस शहरात कमकुवत होत चालल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

       

     शहराध्यक्ष पद रिक्त झाल्याने सध्या वणी शहर काँग्रेस नेतृत्वशून्य आणि दिशाहीन अवस्थेत असून, याचा थेट फायदा विरोधी पक्ष घेत असल्याचे चित्र आहे. जर तात्काळ ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत, तर वणी शहरातून काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


     आता प्रश्न एकच आहे —
वणी शहर काँग्रेसला सावरणारा, जनतेत विश्वास निर्माण करणारा आणि विरोधकांना ठोस टक्कर देणारा नवा चेहरा कोण?
पक्ष नेतृत्वाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला आणखी मोठी किंमत मोजावी लागेल, अशी राजकीय जाणकारांची स्पष्ट भूमिका आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad